Last Updated: Monday, February 27, 2012, 00:29
www.24taas.com, नोएडाटीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी संसद सदस्य चोर, दरोडेखोर आणि बलात्कारी असल्याचं विधान केल्यानंतर मोठ्या वादंगाला तोंड फूटलं आहे. देशातल्या जकीय नेत्यांनी केजरीवाल यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
केजरीवाल यांनी एका जनजागृती कार्यक्रमात बोलताना संसदेवर दरोडखोर आणि बलात्कारी लोकांनी ताबा घेतल्याचं म्हटलं. संसदेच्या चारित्र्य घडवावं लागेल आणि तीच शासमोरचा सगळ्यात मोठी समस्या आहे असं केजरीवाल म्हणाले. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांनतर काही बदल घडेल या भ्रमात राहता कामा नये असं केजरीवाल म्हणाले.
जनलोकपाल विधेयकाचा लढा अधिक व्यापक झाला असून संपूर्ण राजकीय व्यवस्थाच बदलली पाहिजे असं केजरीवालांनी मत नोंदवलं. सर्व राजकीय पक्ष भ्रष्टाचारी आहेत. राजकीय पक्ष केवळ लुटण्यासाठी आपसात लढत असतात. देशाचा विकास आणि प्रगती याच्याशी त्यांना काही देणंघेणं नसतं. आज सरकारी खजिन्याची लुट करता येत नसल्यामुळेच काँग्रेस आकंडतांडव करत असल्याचं सांगत केजरीवाल यांनी कडाडून हल्ला चढवला.
भाजप आणि काँग्रेस मध्ये काहीच फरक नाही आणि त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीगड, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात भ्रष्टाचार रोखण्यासाठी काहीही केलं नसल्याचंही केजरीवाल म्हणाले. प्रकाश जावडेकरांनी अरविंद केजरीवालांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भाकपचे गुरुदास दासगुप्तांनी केजरीवालांनी संसदेचा अवमान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
First Published: Monday, February 27, 2012, 00:29