केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा राष्ट्रव्यापी संप - Marathi News 24taas.com

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा राष्ट्रव्यापी संप

www.24taas.com, नवी दिल्ली
 
केंद्र सरकारी आणि विविध नवरत्न कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी उद्या देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात देशातल्या राष्ट्रीयकृत बँकाही सहभागी झाल्या आहेत.
 
देशातल्या अकरा मोठ्या आणि पाच हजार लहान कामगार संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. बेरोजगारी,सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचं खासगीकरण करु नये, रोजगार निर्मितीत चालना आणि किमान वेतन कायद्या सुधारणा अशा वेगवेगळ्या मागण्या संपकरी कर्मचाऱ्यांनी मांडल्या आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळं बँकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत.
 
या संपाला महापालिका कर्मचारी आणि मंत्रालयातल्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र संपात सक्रिय सहभागी होणार नाही असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं मंत्रालय आणि महापालिका प्रसासनाचं कामकाज बाधित होणार नाही असा दावा करण्यात येत आहे.

First Published: Monday, February 27, 2012, 09:15


comments powered by Disqus