Last Updated: Wednesday, February 29, 2012, 13:28
www.24taas.com, नवी दिल्ली दिल्ली पोलिसांनी लष्क-ए-तैयबाच्या दोन आतंकवाद्यांना अटक केली आहे. हे आतंकवादी राजधानीमध्ये मोठा घातपात करण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळाली आहे.
हे आतंकवादी एक मोठी देशविघातक कारवाई करण्यासाठी आले होते. देशातील काही मोठ्या संस्था या त्यांच्या निशाण्यावर होत्या. पण, त्यावर हल्ले करण्यापूर्वीच हे आतंकवादी पकडले गेले.
दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलने नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ लष्कर-ए-तैबाच्या या दोन आतंकवाद्यांना पकडलं. या आतंकवाद्याकडून मोठ्य़ा प्रमाणात हत्यारं, स्फॉटकं आणि काही महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कागदपत्रं भारत सरकारशी संबंधित आहेत. दिल्लीतील काही अतिमहत्त्वपूर्ण व्यक्तींबरोबरच वेगवेगळे बाजारही या आतंकवाद्यांचे टार्गेट होते.
First Published: Wednesday, February 29, 2012, 13:28