Last Updated: Tuesday, November 8, 2011, 05:40
झी २४ तास वेब टीम, दिल्ली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनावर कडवी टीका करणारे स्वामी अग्निवेश आता बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येतंय. ते आज बिग बॉसच्या घरात प्रवेश करतील.
स्वामी अग्निवेश यांचा जवळचा मित्र मनूसिंह यांच्या माहितीनुसार अग्निवेश यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करायला होकार दिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपला संदेश देणार आहेत.
स्वामी अग्निवेश बिग बॉसच्या घरातले पाचवे पुरूष स्पर्धक असतील आणि या कार्यक्रमात अग्निवेश वेगळेपण आणतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय.
First Published: Tuesday, November 8, 2011, 05:40