अझरूद्दीन पुन्हा अडचणीत, वॉरंट बजावलं - Marathi News 24taas.com

अझरूद्दीन पुन्हा अडचणीत, वॉरंट बजावलं

www.24taas.com, नवी दिल्ली
 
दिल्लीतील कोर्टाने चेक न वटल्याने म्हणजेच चेक बाउंस झाल्यामुळे सुरू असलेल्या खटल्यामध्ये व्यक्तीगतरित्या न्यायालयात हजर नसल्याने भारतीय टीमचा माजी कॅप्टन आणि काँग्रेसचा खासदार मोहम्मद अझरूद्दीन विरूद्ध गुरवारी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे.
 
प्रांताधिकारी विक्रांत वैद्यनी अजरूद्दीनच्या वकिलांनी त्याला उपस्थित राहण्याबाबत सुट मिळावी अशी याचिका दाखल केल्यानंतर हे वाँरट जारी करण्यात आलं. अजहरच्या वकीलांनी सांगितले की, उत्तरप्रदेश विधानसभा प्रचारासाठी अजहर व्यस्त असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही.
 
न्यायालयाने अजहरला उपस्थित राहण्याबाबत सूट मिळावी या याचिकेला नाकारलं आणि त्याला ७ मार्चला उपस्थित राहण्याचे आदेश बजावला आहे. तसचं या खटल्याच्या अंतिम सुनावणीला उपस्थित न राहिल्याने त्याचाविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. अजहर विरूद्ध मुंबईच्या संजय सोळंकीने याचिका दाखल केली आहे.
 
सोळंकीने अजहरला मुंबईत काही व्यवहारात मदत केल्याने या व्यवहारात १.५ कोटीचा सौदा झाला होता. त्यानुसार सोळंकीला अजहरने १.५ कोटी देण्याचं मान्य केलं होतं पण हा सौदा झाला नाही पण काही अटीनुसार तीन कोटी देणं लागत होतं, परंतु तसं न झाल्याने अजहरविरूद्ध हा खटला दाखल केला आहे.
 
 
 

First Published: Thursday, March 1, 2012, 18:53


comments powered by Disqus