कारागृह अधीक्षक ५०कोटींचा धनी - Marathi News 24taas.com

कारागृह अधीक्षक ५०कोटींचा धनी

www.24taas.com,इंदूर
 
इंदूरमधील मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कोट्यवधी रूपयांचा धनी असल्याचे उघड झाले आहे.   गुरुवारी लोकायुक्त पोलिसांनी छापा घातला. यामध्ये सुमारे ५० कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. त्याच्यीकडे आणखी  संपती सापडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
कारागृह अधीक्षक पुरुषोत्तम सोमकुंवर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. मध्यवर्ती कारागृहासमोर असलेल्या त्यांच्या बंगल्यावर आणि भोपाळमधील त्यांच्या घरावर छापा मारला. या छाप्यांमध्ये सोमकुंवर यांच्या नावावर भोपाळमध्ये तीन बंगले, एक वसतिगृह, दोन दुकाने, तीन गावांमध्ये जमीन, तर इंदूरमध्ये चार कोटींचा फ्लॅट आणि काही कागदपत्रे सापडली आहेत, अशी लोकायुक्त पोलीस अधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी दिली.

First Published: Friday, March 2, 2012, 15:42


comments powered by Disqus