कनिमोळीच्या जामिनावरून सीबीआयला नोटीस - Marathi News 24taas.com

कनिमोळीच्या जामिनावरून सीबीआयला नोटीस

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
कनिमोळी यांच्यासह इतर चारजणांच्या जामीन अर्जाला प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) नोटीस पाठवली.   एक डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यास या नोटिसीत म्हटले आहे.
 
टू जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी  कनिमोळी, शरद कुमार, असिफ बलवा, राजीव अगरवाल आणि करीम मोरानी  यांचे जामीन सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तीन नोव्हेंबर रोजी अर्ज नाकारले होते. त्यानंतर  कनिमोळी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज  झालेल्या सुनावणीवेळी  न्यायालायने सीबीआयला नोटीस पाठविली.
 
सीबीआयच्या वकीलांनी कनिमोळीच्या जामिनाला सीबीआयचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. सीबीआयने कधीच आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही. कनिमोळी यांना एक महिला आणि आई होण्याच्या आधारावर जामीन देण्यात यावा, अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे.

First Published: Wednesday, November 9, 2011, 10:24


comments powered by Disqus