गुजरात दंगल, ३१ जण दोषी - Marathi News 24taas.com

गुजरात दंगल, ३१ जण दोषी

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद
 
गुजरातमधील सरदारपुरा येथे २००२ मध्ये झालेल्या  दंगलींसंदर्भात विशेष कोर्टाने आज  ७३ आरोपींपैकी ३१ जणांना दोषी ठरवले आहे.
 
पुरावे न मिळाल्याने ४२ जणांना निर्दोष मुक्त केले आहे. या दंगलीमध्ये ३३ जणांना जिवंत जाळण्यात आले होते.   दोषी ठरवण्यात आलेल्या ३१ जणांमधील मुख्य आरोपीबद्दल  निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
गुजरातमध्ये २००२मध्ये  झालेल्या गोध्रा हत्याकांडाच्या दोन दिवसांनंतर, सरदारपुरा या गावात जातीय दंगल झाली होती. यात एका घराला आग लावण्यात आली होती. त्यात २० महिलांसहित एकूण ३३ लोकांचा मृत्यू झाला होता.

First Published: Wednesday, November 9, 2011, 11:34


comments powered by Disqus