गोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप - Marathi News 24taas.com

गोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप

www.24taas.com,पणजी
 
मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.
 
गोव्यात भाजपने ५ तर काँग्रेसने २ जागांवर विजय मिळाला आहे. मगोवाने एका जागेवर बाजी मारली आहे. पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने तर दुसरा भाजपच्या बाजूने निकाल लागला. गोव्यात ४० जागांसाठी निवडणूक झाली. आतापर्यंत १३ जागांवर भाजप तर काँग्रेस ५ आणि अन्य ३ जागांवर आघाडीवर आहे.
 
 

पाच राज्यातील निवडणूक निकालांचे हायलाइट्स


 

गोवा


मगोपबरोबरच्या युतीचा भाजपला फायदा
गोव्यात भाजपने जिंकल्या पाच जागा |
गोव्यात भाजपची मुसंडी.
१३ ठिकाणी भाजप आघाडीवर
काँग्रेसची मात्र ३ मतदारसंघांत  आघाडी
 
 
उत्तर प्रदेश
बसपाच्या पीछेहाटीमुळे सन्नाटा
मायावतींच्या निवासस्थानी शुकशुकाट
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आघाडीवर
बहुजन समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर
भाजप तिसऱ्या स्थानावर

काँग्रेस चौथ्या स्थानावर
 

पंजाब


अकाली दल- भाजपला पूर्णबहुमत
पंजाबमधील ११७ जागांचे कल हाती.
पंजाबमध्ये काँग्रेसचं स्वप्न धुळीला मिळणार.
सलग दुसऱ्यांदा अकाली दलाची सत्ता कायम राहाण्याची चिन्हं.
मुख्य़मंत्री प्रकाशसिंग बादल आघाडीवर
 
 
उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये उत्कंठावर्धक निकाल
काँग्रेसलाही सत्तास्थापनेची मोठी संधी
उत्तराखंडमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता 
छोटे पक्ष आणि बसप ठरणार किंगमेकर  



 
 

First Published: Tuesday, March 6, 2012, 11:10


comments powered by Disqus