कही खुशी, कही गम- सुषमा स्वराज - Marathi News 24taas.com

कही खुशी, कही गम- सुषमा स्वराज

www.24taas.com, नवी दिल्ली
 
पाच राज्यांच्या विधानसभेमध्ये भाजपसाठी कही खुशी कही गम अशी स्थिती असल्याची प्रतिक्रिया स्वराज यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला चांगलं प्रदर्शन करण्यात अपयश आलं असून पक्ष त्याबाबत समीक्षा करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी दिली आहे.
 
बसपाला हटविण्यासाठी जनतेनं सपाला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, काँग्रेसला उत्तरप्रदेशात चांगलाच दणका बसला आहे. गोव्यामध्ये काँग्रेसकडून सत्ता भाजपनं खेचून आणली आहे.
 
तर उत्तराखंडमध्ये बहुमताच्या जवळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे भाजपसाठी कही खुशी कही गम अशी स्थिती असल्याची प्रतिक्रिया स्वराज यांनी दिली आहे.
 
 

First Published: Tuesday, March 6, 2012, 20:16


comments powered by Disqus