एड्सवर प्रथमच लस - Marathi News 24taas.com

एड्सवर प्रथमच लस

www.24taas.com, हवाना
 
क्युबात शास्त्रज्ञांनी एड्सच्या नव्या लसीची उंदरावर चाचणी यशस्वी करुन दाखवली आहे. आता लवकरच माणसावर चाचणी करण्यात येणार आहे. शास्त्रज्ञांच्या टीमचे प्रमुख एनरिक इग्लेशियस यांनी काल हवानात सांगितल  की एड्सच्या नव्या लसीची प्रयोगशाळेत उंदारांवर यशस्वी चाचणी करण्यात आल्याचं सांगितलं. आता लवकरच एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांवर याची चाचणी घेण्याची तयारी सुरु आहे. ही चाचणी ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर नाही त्यांच्यावर करण्यात येणार आहे.
 
काल क्युबाची राजधानीत इंटरनॅशनल बायोटेक कॉनफ्रन्स हवाना २०१२ मध्ये बायोटेक एँड जेनेटिक इंजिनिअरिंग सेंटर ज्यांनी ही लस विकसीत करणाऱ्या टीमचे प्रमुख इग्लेशियस यांनी ही माहिती दिली. टेरावैक-एचआईवी-१ ही लस वेगवेगळ्या प्रथिनांपासून तयार करण्यात आली आहे. एचआयव्ही वायरसनिपात करणं हा या लशीचा उद्देश आहे.
 
आतापर्यंत एचआयव्ही रुग्णांवर १०० हून अधिक क्लिनिकल चाचण्या अयशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे ही लस यशस्वी ठरेल का हा मोठा प्रश्नच आहे
 
 

First Published: Wednesday, March 7, 2012, 13:49


comments powered by Disqus