Last Updated: Wednesday, November 9, 2011, 16:02
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर अजून वाढल्या, तर आपण सरकारचा असलेला पाठिंबा काढून घेऊ, असे तृणमुल कॉंग्रेस अध्यक्षा आणि पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज एका बैठकीत सांगितले.
सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या, तर आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सरकारला ममता दीदीनी आता नविनच दणका दिला आहे.
First Published: Wednesday, November 9, 2011, 16:02