सोन्याला नवी झळाळी, नवा उच्चांक - Marathi News 24taas.com

सोन्याला नवी झळाळी, नवा उच्चांक

झी २४ तास वेब टीम
 
सोनं दिवसेंदिवस झळाळतच चालला आहे असे दिसून येते, पण त्यामुळे सोनं ही फक्त श्रीमतांच्या चैनीची गोष्ट झाली आहे. कारण की सोन्याच्या वाढत्या किंमतीने अक्षरश: आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोनं हे सामान्याच्या आवाकाच्या बाहेरची गोष्ट झाली आहे.
 
सोनं चादीच्या भावाने पुन्हा उच्चांक गाठला. 10 ग्राम साठी सोन्याचा दर 29,186 रुपयांवर पोहोचला. गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली होती मात्र सोनं पुन्हा तेजीत आलं. युरोपमध्ये उद्भवलेल्या कर्जाच्या संकटामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात सेफ म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे युरोपमध्ये सोन्याची मागणी फार वाढली त्यामुळेच सोन्याचे भाव वाढल्याचं तज्ञांच म्हणणं आहे तर भारतातही आता लग्नसराईस सुरुवात होणार आहे. त्यामुळेही सोन्याच्या भावावर मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत. मुंबईत सोन्याचा भाव 28895 रुपयांवर पोहोचला आहे तर कोलकात्यात सोन्याचा भाव 29 हजारांवर गेला तर चेन्नईत सुद्धा सोन्याच्या भावाने 29 हजारांचा उच्चांक गाठला.

First Published: Wednesday, November 9, 2011, 18:44


comments powered by Disqus