आयपीएस अधिका-याला टॅक्टरखाली चिरडले - Marathi News 24taas.com

आयपीएस अधिका-याला टॅक्टरखाली चिरडले

www.24taas.com, भोपाळ
 
मध्यप्रदेशमध्ये खाणमाफियांचा धुमाकुळ सुरू आहे. या माफियांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या अंगावर टॅक्टर घालून चिरडले. मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या राज्यात माफिया राज असल्याने सर्वच थरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  नरेंद्र कुमार हे आपले कर्तव्य बजावत होते. या आधी महाराष्ट्रातही यशवंत सोनवणे यांचाही बळी भेसळ करणाऱ्या माफियांनी घेतला होता.
 
 
कुमार हे ३२ वर्षां असून ते २००९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पत्नीही आयएएस अधिकारी आहेत. मध्यप्रदेशमध्ये मोरैना येथे अवैध खाणकाम रोखण्यास गेलेले आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांना टॅक्टरखाली चिरडून मारले.  मोरैना भागातील एसडीओपी असलेले कुमार यांना अवैध खाणकाम चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ते तेथे ते रोखण्यास गेले होते. तेथेच माल उचलत असणा-या ट्रॅक्टरच्या चालकाने कुमार यांच्या अंगावरच टॅक्टर चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना ग्वॉल्वेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले मात्र रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
 
 

हत्येच्या आरोपाखाली मनोज केशव सिंह नावाच्या व्यक्तीविरोधात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.  आरोपींच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी सांगितले  आहे. जेथे अवैध खाणकाम चालू होते तेथे दगडाचे उत्खनन चालू होते. माहिती मिळताच कुमार तेथे पोहचले.
 
 
तेथे टॅक्टर दगड घेऊन चालला होता. त्यावेळी टॅक्टर चालकाने कुमार यांच्या जीपवर टॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी कुमार यांनी उतरुन टॅक्टर चालकाला टॅक्टर थांबवण्यास सांगितले. मात्र कुमार टॅक्टरला आडवे गेले मात्र त्याने टॅक्टर न थांबवता कुमार यांच्या अंगावर घातला आणि चिरडले.
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Thursday, March 8, 2012, 21:00


comments powered by Disqus