पॅकींग करा मशिनने, नफा मिळवा जास्तीने - Marathi News 24taas.com

पॅकींग करा मशिनने, नफा मिळवा जास्तीने

झी २४ तास वेब टीम
 
शेतीचं आधुनिक पद्धतीनं उत्पादन घेतल्यानंतरही शेतकरी शेतीमालाची प्रतवारी करीत नाही त्यामुळे त्याला व्यापारी निम्म्याहून कमी भाव देतात. त्यामुळे पॅकिंग मह्त्वाचा भाग आहे. जपानमध्ये भाजीपाल्याची पॅकिंग मशिन्स द्वारे केल्याने तिथल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो.
 
भाजीपाल्याची बाबतीत मात्र पॅकिंग महत्वाची बाब आहे. सध्या ग्राहकांची मानसिकता बदलत चालली असल्याने येत्या काळात शेतकऱ्यांनी पॅकिंग करुन जास्त दर मिळणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या मशिन्स बचत गटांनी किंवा शेतकरी गटांनी विकत घेउन शहरात भाजीपाल्याच्या उत्पादनापासून चांगलं उत्पादन घेता येईल.
 
सध्याचा ग्राहक हा स्वच्छता आणि नीटनेटकेपणाला जास्त पैसे मोजतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या मशिन्स वापरुन जास्तीचा नफा कमावण्याचा प्रयत्न करायला हवा.

First Published: Friday, November 11, 2011, 08:40


comments powered by Disqus