Last Updated: Tuesday, March 13, 2012, 12:49
www.24taas.com, नवी दिल्ली 
लोकसभेच्या अधिवेशन सुरूवात झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच लोकसभेत भाषण करताना केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना चक्कर आली. लोकसभेचे कामकाज सुरू असताना शरद पवार यांना चक्कर आली, लोकसभेत शरद पवारांना भोवळ आली असल्याने त्यांना त्वरीत रूग्णालयात पाठविण्यात आले. लोकसभेचं कामकाज सुरु असताना हा प्रकार घडला. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
गेले दहा दिवस शरद पवार यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांनी गेली काही दिवस मुंबईमध्ये विश्रांती घेत होते. त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. मात्र अजूनही डॉक्टरांनी चक्कर येण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही.
संसदीय कामकाज सुरू असताना चक्कर येणं हे मात्र काही नवीन नाही. याआधी एनडीएच्या काळात भैरवसिंह शेखावत उपराष्ट्रपती असताना त्यांना देखील भाषण करताना चक्कर आली होती. तर काही दिवसापूर्वी राज्यपाल के. शंकर नारायणन चक्कर आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. ‘केरला भवन’च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्यपाल आले होते तेव्हा त्यांना चक्कर आली होती. सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान भाषण संपवताना राज्यपालांना चक्कर आली होती.
First Published: Tuesday, March 13, 2012, 12:49