७०० पाकिस्तानी बनले भारताचे नागरिक - Marathi News 24taas.com

७०० पाकिस्तानी बनले भारताचे नागरिक

www.24taas.com, नवी दिल्ली
 
गेल्या तीन वर्षांत ७००हून अधिक पाकिस्तानी व्यक्तींना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं असल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली.
 
या संदर्भात लेखी उत्तर देताना गृह राज्यमंत्री मुलापल्ली रामचंद्रन म्हणाले, २००९ साली ३२१ पाकिस्तानी लोकांना भारताचं नागरिकत्व दिलं गेलं.२०१० मध्ये १५० पाकिस्तानी लोक भारताचे नागरिक बनले. पण, २०११ मध्ये मात्र पुन्हा हा आकडा वाढला. २०११मध्ये ३०० पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं.
 
२००९ मध्ये पाकिस्तानी लोकांच्या भारतीय नागरिकत्वासंबंधित ३१ निवेदनं नाकारण्यात आली. २०१० मध्ये ५४ निवेदनं नाकारली गेली, तर २०११ मध्ये केवळ १४ निवेदनं नाकारली गेली.
 
२००९ मध्ये २८४ अफगाणी लोक भारतीय नागरिक बनले. २०१० मध्ये ही संख्या घसरून ९ इतकी झाली, पण, २०११ मध्ये पुन्हा १४ पर्यंत हा आकडा वाढला.

First Published: Wednesday, March 14, 2012, 09:39


comments powered by Disqus