रेल्वे बजेट: यंदा रेल्वे भाडेवाढ होणार? - Marathi News 24taas.com

रेल्वे बजेट: यंदा रेल्वे भाडेवाढ होणार?

www.24taas.com, नवी दिल्ली
 
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी आज रेल्वे बजेट २०१२-१३ मांडणार आहेत. रेल्वे प्रवाशांना या बजेटकडून फारच अपेक्षा असणार आहेत. आर्थिक संकटात असणार जग आणि त्यातच सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्क असणाऱ्या रेल्वेसाठी आर्थिक भार उचलण्यासाठी दिनेश त्रिवेदी नक्की काय करणार हे देखील महत्त्वाचं आहे.
 
बजेटमध्ये प्रवासी भाडे, नव्या रेल्वेगाड्या सुरक्षा आणि इतर सोयीसुविधा यावर रेल्वेमंत्री काय देणार यावर लोकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्रिवेदी रेल्वे मंत्री म्हणून पहिल्यांदाच रेल्वे बजेट मांडणार आहेत. आर्थिक संकटात असणाऱ्या भारतीय रेल्वेला पुन्हा रूळावर आणण्यासाठी त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे.
 
तसचं प्रवासी भाड्यात वाढ होणार का? याकडेच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मागील अनेक वर्षापासून रेल्वेच्या भाड्यात वाढ झालेली नाही, आणि रेल्वेची अवस्था पाहता असे वाटते की, यावेळेस भाडेवाढ ही होण्याची शक्यता आहे. आणि याआधीच रेल्वेमत्र्यांनी संकेत दिलेले आहे.
 
प्रवासी भाडे २००२-०३ या वर्षानंतर वाढविण्यात आलेले नाही. पूर्व रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी ह्या प्रवासी भाडेवाढ व्हावी या विरोधात आहेत. आणि रेल्वेमंत्री त्रिवेदी हे देखील तृणमूलचे सदस्य आहेत.
 
रेल्वेला मागील वर्षी २० हजार कोटींची मदत देण्यात आली होती. आणि सहा फेब्रुवारीला केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३००० कोटी रूपयांचे कर्ज जाहीर केले होते, पण योग्य आर्थिक हिशोब नसल्याने भारतीय रेल्वेमध्ये ७००० कोटींचा तोटा आला होता. यामुळे यंदा रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
 

First Published: Wednesday, March 14, 2012, 10:39


comments powered by Disqus