गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्तनाचा कॅन्सर - Marathi News 24taas.com

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्तनाचा कॅन्सर


www.24taas.com, मेलबर्न 
 
 
गर्भनिरोधक गोळ्या सेवन केल्या तर स्तनाचा तसेच गर्भाचा कॅन्सर होऊ शकतो. ही शक्यता एका अभ्यासातून पुढे आली आहे. इंजेक्सजनच्यामाध्यातून औषधात घेतल्याने स्तनाचा कॅन्सर १.७ टक्के तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे १.४ टक्के धोका असतो.
 
 
 
ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय विश्वविद्यालय आणि सामाजिक संघटनांनी केलेल्या पाहणीत  गर्भ निरोधक गोळ्यांमुळे कॅन्सराचा धोका जास्त असतो. इंजेक्सनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या औषधामुळे तसेच गोळ्यांमुळे स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होतो. याबाबत खातरजमा करण्यासाठी नॅशनल हेल्थ लेबोरेटरी सर्विस, एनएचएलएसच्या मार्गरेट अर्बन तथा एएनयू के ऐमिली बॅंकच्यामाध्यमातून अभ्यास समिती नेमण्यात आली. या समितीच्या अभ्यासानुसार कॅन्सर होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
 
 
 
बॅंकेच्या अभ्यासानुसार काही निष्कर्ष काढण्यात आले आहे. गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांना कॅन्सचा अस्थायी खतरा असतो समितिच्या अभ्यासानुसार इंजेक्सनच्या माध्यमातून घेतलेल्या औषधामुळे हार्मोनमध्ये वाढ होते. त्यामुळे याची परिणीती कॅन्सला निमंत्रण देणारी ठरती. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने कॅन्सर होतो. दरम्यान, काहीकालांतराने हा धोका कमीही होण्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, March 14, 2012, 10:36


comments powered by Disqus