सामान्यांसाठी चांगलं असणार बजेट - रेल्वेमंत्री - Marathi News 24taas.com

सामान्यांसाठी चांगलं असणार बजेट - रेल्वेमंत्री

www.24taas.com, नवी दिल्ली
 
संसदेत रेल्वे बजेट मांडण्यापूर्वी आज रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, 'सामान्यांसाठी हे रेल्वे बजेट चांगलं असणार आहे'. (आम आदमी के लिए रेल बजेट अच्छा होगा) या शब्दात त्यांनी आपलं मत माडलं. रेल्वे भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळेच रेल्वेत नफा झाल्यास देशही समृद्ध होईल.
 
रेल्वेमंत्री त्रिवेदी यांनी असे संकेत दिले आहेत की, रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होणार नाहीत. त्रिवेदी आज लोकसभेच्या प्रश्नउत्तरांच्या तासानंतर रेल्वे बजेट मांडतील. हे त्याचं पहिलचं रेल्वे बजेट आहे. विशेष हे आहे की, रेल्वेच्या प्रवासी भाड्यात २००३ पासून कोणतीच भाडेवाढ केली गेलेली नाही.
 
पण त्यामुळेच ह्या वर्षी  रेल्वे भाड्यात यावर्षी दरवाढ केली जाईल असे सांगण्यात येत होते, पण भारतीय रेल्वेची स्थिती पाहता, प्रवाशांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवणं आणि त्याचसोबत आर्थिक भार संभाळणं या गोष्टींसाठी रेल्वेमंत्र्यांना कसरत करावी लागणार आहे.
 
 
 

First Published: Wednesday, March 14, 2012, 11:44


comments powered by Disqus