Last Updated: Thursday, March 15, 2012, 15:30
www.24taas.com, नवी दिल्ली 
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले.
येत्या पाच वर्षात रेल्वे अपघात कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सध्याच्या सुरक्षा उपायांवर आम्ही समाधानी नाही ही त्यांची स्पष्टोक्ती बरंच काही सांगून जाते. सुरक्षिततेच्या कडक उपाययोजनांसाठी रेल्वे सुरक्षा प्राधिकरण स्थापन करणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं आहे.
रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाच लाख ६० हजार कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम रेल्वे हाती घेणार आहे. तसंच रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. पायाभूत सुविधांसाठी अडीच लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सॅम पित्रोडा समितीने तयार केलेल्या आधुनिकतेच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रेल्वे बजेटमधील ठळक वैाशिष्ट्ये
- रेल्वेचा भाड्यात वाढ, २ पैसा प्रति किमी भाडेवाढ
- लोकलचा प्रवास प्रति किमी २ पैसे, तर एक्स्प्रेस ३ पैशांनी महागला
- स्लिपरचा प्रवास प्रति किमी ५ पैसे तर एसीचा प्रवास १० पैशांनी महागला
- एसी २ टियर प्रवास प्रति किमी १५ तर एसी फर्स्ट क्लास ३० पैशांनी महागला
- लोकलचे किमान भाडे पाच रुपये तर प्लॅटफॉर्म तिकिट ५ रुपये
- सीएसटी-कसारा १ रु. ३४ पैसे,
- पनवेल १ रु. २० पैसे महाग,
- चर्चगेट-विरार १ रुपये २८ पैशांनी वाढणार
- सीएसटी-कल्याण तिकीट १ रू. २५ पैसे रुपयांनी वाढलं
- रेल्वे मंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात
- रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देणार
- सर्व पक्षांचे दिनेश त्रिवेदींनी मानले आभार
- जान है तो जहाँ है, हे आमचे ब्रीद वाक्य
- रेल्वेचे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न
- सध्याच्या सुरक्षा उपायांवर आम्ही समाधानी नाही- त्रिवेदी
- रेल्वे रिसर्च अँड कॉर्पोरेशनची घोषणा
- रेल्वे सुरक्षा प्राधिकरण स्थापन करणार
- रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी कटीबद्ध – त्रिवेदी
- रेल्वेच्या सुरक्षेसाठी स्पेस सायंटिसची मदत घेणार
- रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राकडून गुंतवणुकीची अपेक्षा
- रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी ५.६ लाख कोटी रुपये
- अडीच लाख कोटी पायाभूत सुविधांसाठी देणार
- आधुनिकेतेचा आराखडा तयार, सॅम पित्रोडाच्या समितीने दिला आराखडा
- सीमा भागातील राज्यात रेल्वेचे जाळे पसरविणार
- ४८७ नवीन रेल्वे प्रकल्प अजूनही प्रलंबित
- पुढच्या पाच वर्षात रेल्वे क्रॉसिंग बंद करणार
- रेल्वे मार्ग कमी म्हणून गाड्या वाढविणे अवघड
- पुढील १० वर्षात १४ लाख कोटींची आवश्यकता
- हाथोंके लकीरोसे जिंदगी नही बनती, हमारा भी कोई हिस्सा है जिंदगी बनाने मैं
- ५७४१ मागण्या माझ्यापर्यंत पोहचल्या, लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार – त्रिवेदी
- देश के रंगोंमे दौडती है रेल... देश के हर अंग मै दौडती है रेल
- मागास विभागांचा रेल्वेच्या माध्यमातून विकास करणार
- यंदा ६० हजार १०० कोटींचे रेल्वे बजेट
- १९ हजार किमीच्या मार्गांचे पाच वर्षात आधुनिकीकरण
- १२ व्या योजनेत रेल्वे सुरक्षेसाठी १६८४२ कोटी रुपये
- पॅसेंजरचा वेग ताशी १६० किमी नेण्याचा प्रयत्न
- पाच वर्षात सिग्नल यंत्रणेसाठी ३९ हजार ११० कोटी
- २५ टन असणाऱ्या नवीन व्हॅगन आणणार
- कमीत कमी हानी करणारे डबे आणणार
- नवी मुंबई आणि पनवेलमध्ये नवीन कोचिंग फॅक्टरी
- रेल्वे ट्रॅक, संचार, पूल, सिग्नल, स्टेशन या पाच क्षेत्रांवर भर
- स्थानकांच्या विकासांमुळे नव्या ५० हजार नोकऱ्या
- ११०२ कोटी रुपये प्रवाशांच्या सुविधेसाठी
- विमानतळांच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणार
- ७०० किमी लांबींचे नवे ४५ रेल्वे मार्ग टाकले जाणार
- ८० टक्के रेल्वे गाड्या १९ हजार किमी मार्गावर
- ६८७२ कोटींचे नवीन रेल्वे मार्ग टाकणार
- आदिवासी भागांमध्ये नवीन रेल्वे मार्ग
- निधींच्या कमतरतेमुळे रेल्वेची कामे रखडली
- नवीन १४४ मार्गांचे सर्वेक्षण करणार
- ८०० किमी रेल्वेचे मार्ग आता ब्रॉडगेज होणार
- मुंबई लोकलमध्ये १५०० नवे डबे जोडले गेले
- मुंबई ईस्ट-वेस्ट जोडण्यासाठी अभ्यास सुरू
- हार्बर लाइनवर १२ डब्यांसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार
- मुंबई- वेस्टर्न रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेही डीसीची एसी होणार
- पनवेल ते विरार जोडण्याचा प्रयत्न सुरू
- चर्चगेट विरार फास्ट कॉरिडोअरसाठी अभ्यास सुरू
- मुंबईसाठी एमयूटीपी-३ ची घोषणा
- मार्केटिंगवर भर दिला जाईल
- सीएसटी-कल्याण दरम्यान नवीन रेल्वे कॉरिडोर
- प्रवासी डब्यांची फॅक्टरी केरळमध्ये
- ओडिसामध्ये मालगाडी तयार करण्याचा कारखान होणार
- रेल्वे आंतरराष्ट्रीय बनविणार
- मालवाहतुकीसाठी आगरतळा- बांगलादेश मार्गाचा विचार
- प्रतिक्षा यादीतील व्यक्तींना दुसऱ्या रेल्वे मार्गाचा पर्याय उपलब्ध
- रेल्वे स्टेशनवर स्वच्छता अधिक काटेकोर पद्धतीन होणार
- ई-तिकिटची प्रिंट सोबत घेण्याची गरज नाही
- ई-तिकीटचा एसएमएस हाच तिकीट मानला जाणार
- जागतिक स्तरावरील अन्न पुरविले जाणार
- पुणे-मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर संपूर्ण
- प्रतिष्ठित कंपन्यांना खाण्यापिण्याचे कंत्राट देणार
- स्वच्छतेसाठी नवीन हाऊस किंपिंग बॉडी तयार
- २५०० डबे बायोटॉलेट बनणार
- १० खेळांडूंना रेल- खेलरत्न पुरस्कार देणार
- रेल्वेचे पाच खेळाडू ऑलिंम्पिकसाठी पात्र
- रेल्वे कर्मचाऱ्यांना कामाच्या जागी आरोग्य सेवा देणार
- प्रवाशांना रेल्वेच्या वेळेबाबत एसएमएसने कळविणार
- नेपाळ रेल्वेद्वारे जोडणार
- रेल्वेत नवीन १ लाख नोकऱ्या
- २०११मध्ये ८० हजार जणांना नोकऱ्या दिल्या
- रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देणार
- ७५ नव्या एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा
- चेन्नईमध्ये १८ नव्या लोकल गाड्या
- मुंबईसाठी ७५ नव्या लोकल गाड्या
- अमृतसर-पाटणा-नांदेड गुरूपरिक्रमा एक्स्प्रेस सुरू करणार
- हायस्पीड ट्रेनसाठी पाच कॉरिडोरचा अभ्यास सुरू
- ७५ नव्या गाड्यांची घोषणा
- प्रवाशांच्या संख्येत यंदा घट झाली
- रेल्वेची मिळकतही घटली, रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट
- ५.४ टक्के प्रवासी वाढविण्याचे लक्ष्य
- प्रवासी भाड्यातून रेल्वेला ३६ हजार कोटी मिळाले
- ३६ गाड्यांवर सॅटेलाइटवरून लक्ष ठेवले जाणार
- अपंगासाठी २१०० कोच तयार
- कोलकता रिजनसाठी ५० नव्या गाड्या
- डबल डेकर मालगाड्या चालणार
- अर्जुन पुरस्कार विजेत्यांना, शताब्दी गाड्यांमधून मोफत प्रवास
- स्वतंत्र रेल्वे सुरक्षा प्राधिकारण स्थापणारः रेल्वेमंत्री, अनिल काकोडकर अध्यक्षस्थानी
First Published: Thursday, March 15, 2012, 15:30