Last Updated: Saturday, November 12, 2011, 07:11
झी २४ तास वेब टीम, मुंबई INS सुकन्या या जहाजावरील जवानांनी एका व्यापारी जहाजाच्या अपहरणाचा कट उधळून लावला. अरबी समुद्रात हे थरारनाट्य रंगलं.
या कारवाईत नौदलाच्या जवानांनी २६ सोमालियन चाच्यांना पाठलाग करून पकडलं. त्यांच्याकडून सहा एके-४७ रायफली, १२ मॅगझिन आणि ३०० काडतुसं जप्त करण्यात आलीयेत. समुद्रातल्या लुटालुटीला चाप लावण्यासाठी भारतीय नौदलानं व्यापारी जहाजांना संरक्षण द्यायला सुरुवात केलीये. त्यासाठी INS सुकन्या हे जहाज अरबी समुद्रात गस्तीवर तैनात करण्यात आलंय.
सोमालियन चाच्यांच्या पाच लहान बोटी एक व्यापारी जहाज लुटण्याच्या तयारीत असल्याचं INS सुकन्या मधील जवानांना समजलं. त्यानंतर जवानांनी तात्काळ कारवाई करत या चाच्यांचा डाव हाणून पाडला. दोन बोटीतील जवान मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर तीन बोटी नौदलाच्या जवानांनी ताब्यात घेत २६ चाच्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय.
First Published: Saturday, November 12, 2011, 07:11