बेदी- केजरीवालमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News 24taas.com

बेदी- केजरीवालमध्ये शाब्दिक चकमक

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
किरण बेदी यांच्या आयोजकांकडून बिझनेस क्लासच्या तिकीटाचे पैसे घेऊन इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्यावरुन केलेल्या टीकेला उत्तर देताना बेदी म्हणाल्या की जर केजरीवाल यांनी संपूर्ण मुद्दा लक्षात घेतला असता तर, ते अशा प्रकारे बोलले नसते.
 
बेदी म्हणाल्या, “जर केजरीवाल यांनी हा मुद्दा नीट समजलेला नसावा. जर त्यांना हा मुद्दा समजला असता, तर ते असं म्हणाले नसते.”
 
बेदी आयोजकांकडून बिझनेस क्लासच्या तिकीटाचे पैसे घेऊन प्रवास मात्र इकॉनॉमी क्लासने करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. यासंदर्भात टीम अण्णामधील त्यांचे सहकारी असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं की बेदींनी असं करायला नको होतं. मी त्यांच्या जागी असतो, तर कधीच असं केलं नसतं.

First Published: Saturday, November 12, 2011, 08:43


comments powered by Disqus