दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावर सस्पेन्स - Marathi News 24taas.com

दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावर सस्पेन्स

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांचा हा राजीनामा पंतप्रधान मनमोहन सिंग स्विकारतील का, याचीच उत्सुकता लागली असताना हा राजीनामा ३१मार्चला स्वीकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.
 
 
रेल्वे भाडेवाढीला तृणमूल काँग्रेसनं विरोध केल्यानं सरकारपुढं पेच निर्माण झाला आहे.तर रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी सादर केलेल्या पहिल्याच बजेटमध्ये त्यांनी प्रवाशांना भाडेवाढीचा धक्का दिला आहे. दरम्यान, त्रिवेदींना पक्षाने बाजूला होण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्रिवेदींनी राजीनामा दिला आहे की नाही, याबाबत अधिकृत घोषणा तृणमूल पक्षाकडून करण्यात आलेली नाही. मात्र, पक्ष केंद्रातील आघाडी सरकारला पाठिंबा कायम ठेवणार आहे. त्यामुळे युपीए सकारची होणारी डोकेदुखी दूर झाली आहे.
 
 
आम्ही भाडेवाढीविरोधात कायम आहोत. गरिबांवर भाडेवाढीचा बोजा टाकणार नाही, अशी तृणमूल पक्षाची भूमिका असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.  दरम्यान, ममता बॅर्नजी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितला तर आपण राजीना देऊ अशी भूमिका त्रिवेदींनी घेतली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.
 
व्हिडिओ पाहा..

First Published: Thursday, March 15, 2012, 10:44


comments powered by Disqus