युवराज, बंद करा ‘नाटकबाजी’- मायावती - Marathi News 24taas.com

युवराज, बंद करा ‘नाटकबाजी’- मायावती

झी २४ तास वेब टीम, लखनौ
 
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी शनिवारी राहुल गांधींना चांगलंच फैलावर घेतलं.
 
विकास योजनांच्या लोकार्पण प्रसंगी मायावतींनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं की काँग्रेसच्या युवराजांनी व्होटबॅंकेसाठी उत्तर प्रदेशात चालवलेली आपली नाटकं थांबवावीत. त्यांना एवढाच राग असेल. तर, तो त्यांनी काँग्रेसशासीत प्रदेशात दाखवावा.
 
पेट्रोल, भ्रष्टाचार, महागाई सारख्या मुद्द्यांवर राहुल कधीही काहीच बोलत नाहीत. मात्र, उत्तर प्रदेशात राबवण्यात येणाऱ्या विकासाकामांसाठी केंद्राकडून पैसे मिळवून देण्याऐवजी ते कायम उत्तर प्रदेश सरकार विरोधात प्रचार करण्यातच ते धन्यता मानतात. असा टोलाही मायावतींनी लगावला.

First Published: Saturday, November 12, 2011, 13:31


comments powered by Disqus