Last Updated: Thursday, March 15, 2012, 20:38
www.24taas.com, नवी दिल्लीशब्दश: अर्थाने पाहायचे झाल्यास सरकारचा महसुली खर्च आणि महसुली लाभ यातील ही तफावत आहे. सरकारच्या महसुली खर्चात, विविध सरकारी विभाग आणि सामान्य प्रशासन सेवांसाठी येणारा खर्च (कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते वगैरे), सरकारी कर्जाचे परतफेडीचे हप्ते, त्यावरील व्याज तसेच सरकारकडून दिली जाणारी अनुदाने आदी सर्व अपरिहार्य व न टाळता येणाऱ्या खर्चाचा महसुली खर्चात समावेश होतो.
तर सरकारकडून गोळा होणारा कर, सरकारकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवरील लाभांश, वेगवेगळ्या सेवांसाठी सरकारने आकारलेले शुल्क व अधिभार आदी सर्व आवर्ती मिळकतींचा सरकारच्या महसुली लाभांमध्ये समावेश होतो. महसुली तूट ही साधारणपणे सरकारी कर्जात वाढ करून भरून काढली जाते.
First Published: Thursday, March 15, 2012, 20:38