प्रत्यक्ष कर - Marathi News 24taas.com

प्रत्यक्ष कर

www.24taas.com, नवी दिल्ली

देशातील प्रत्येक व्यक्ती अथवा मालमत्तेवर वैयक्तिकरीत्या लादल्या गेलेल्या करांना ‘प्रत्यक्ष कर’ म्हटले जाते. वैयक्तिक प्राप्तिकर, संपत्ती कर, मालमत्ता कर, कंपनी कर (कॉर्पोरेट टॅक्स), रोखे व्यवहार कर वगैरे प्रत्यक्ष कराची अस्तित्त्वात असलेली रूपे आहेत. हा एक अनिवार्य स्वरूपाचा कर असून, जिवित व्यक्तीला कुठे ना कुठे आपल्या अस्तित्त्वाची खूण म्हणून हे करदायित्व पाळावेच लागते.
 
हे वैयक्तिक करदायित्व इतर कुणावर त्याला लोटताही येत नाही. हीच बाब मालमत्तेलाही लागू होते. घर मालमत्तेचे अस्तित्व जोवर आहे, तोवर तिच्या मालकाला मालमत्ता कर भरावाचा लागतो, तसाच अस्तित्त्वात कंपनीसाठी उद्योजकांना कंपनी कर विहित मर्यादेनुसार भरणे भाग ठरते. याला न टाळता येणारा कर प्रकार म्हटले गेले असले तरी वैयक्तिक प्राप्तिकरातून सूट मिळविण्याच्या अनेक पर्यायांची प्राप्तिकर कायद्यात तरतूद केली गेली आहे.
 
या तरतुदींतून लोकांना कर वाचविणे शक्य बनते, पण इन्फ्रास्ट्रक्चर बॉड्स, कर्जरोखे या गुंतवणूक माध्यमातून लोकांकडून सढळहस्ते निधी पुरविला जातो. ज्यायोगे अनेक पायाभूत सोयीसुविधा उभारल्या जातात आणि पर्यायाने ते देशाच्याच फायद्याचे ठरते.
 

First Published: Thursday, March 15, 2012, 20:59


comments powered by Disqus