अप्रत्यक्ष कर - Marathi News 24taas.com

अप्रत्यक्ष कर

www.24taas.com, नवी दिल्ली
प्रत्यक्ष करांप्रमाणे ज्या करांचे वैयक्तिक दायित्व नाही अशांना ‘अप्रत्यक्ष कर’ म्हटले जाते. विक्री कर, अबकारी कर, सीमा शुल्क (आयात कर), मूल्यवर्धित कर (व्हॅट), सेवा कर, उलाढाल कर, प्रवेश कर, प्रवास कर, विमानतळ कर, मनोरंजन कर, जकात, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, पथकर (टोल) अशी त्याची नाना रूपे आणि प्रत्येक राज्यागणिक वेगवेगळे स्तर तसेच त्यावर अधिभार, अतिरिक्त करांचाही यात समावेश होतो.
 
भारतात आजही सर्वसामायिक अशी मूल्यवर्धित करप्रणाली अस्तित्वात येऊ शकलेली नाही. तर प्रत्येक राज्याच्या कायद्यांनुरूप वस्तूंच्या विक्री आणि सेवा प्रदानतेवर वेगवेगळी करमात्रा लागू असलेली दिसते. जसे देशात बहुतांश अस्तित्वहीन बनलेला जकात कर आजही महाराष्ट्रात कैक ठिकाणी लागू आहे.
 
काही ठिकाणी जकातीऐवजी प्रवेश करही लागू आहे. मात्र जोवर अशा करपात्र उलाढाल अथवा प्रक्रियेत व्यक्ती सामील होत नाही, तोवर अशा अप्रत्यक्ष करांच्या दायित्वापासून वैयक्तिक बचाव शक्य असतो.
 

First Published: Thursday, March 15, 2012, 21:03


comments powered by Disqus