बजेटमुळे सामान्य 'सेट' की जाणार 'विकेट'? - Marathi News 24taas.com

बजेटमुळे सामान्य 'सेट' की जाणार 'विकेट'?

www.24taas.com, नवी दिल्ली
 
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच या अर्थसंकल्पात काही गोष्टीमध्ये भाववाढ झाल्यास सामान्यासांठी मात्र दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागणार आहे.
 
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी म्हटलं होतं की, रेल्वे बजेट हा सामान्यांसाठी असेल, मात्र रेल्वेत भाववाढ करून त्यांनी सामान्यांच्या तोंडाला चांगलीच पाने पुसली आहेत. रेल्वे बजेटनंतर सर्वसाधारण बजेटमध्येही सर्वसामान्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वे बजेटनंतर आता अर्थसंकल्पमध्ये काय वाढून ठेवलं आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बजेटमध्ये घर, कार, फ्रिज, एसी सहित अनेक सामान महागण्याची शक्यता आहे.
 
त्याचबरोबर डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅसही महागण्याची शक्यता आहे. आयकर सवलतीतही फारशी वाढ होणार नसल्याचं दिसत आहे. बजेटमध्ये जवळजवळ सगळ्याच गोष्टी मागणी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रणवदा नक्की काय काय गोष्टी सामान्यांसाठी देतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सरकार रिकामी तिजोरी भरण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी बजेटमध्ये सर्वसामान्य जनतेवर ओढं टाकण्याचा तयारीत आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
 
 
 

First Published: Friday, March 16, 2012, 16:57


comments powered by Disqus