Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:47
www.24taas.com, नवी दिल्ली
समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी बिग बीच्या सौभाग्यवती आणि बॉलिवूडमधून राजकारणात गेलेल्या जया बच्चन यांनी अर्ज दाखल केला आहे.
जया बच्चन यांच्यासह नरेश अग्रवाल, ब्रिज भूषण तिवारी आणि मुनावर सलिम यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्याबरोबरच समाजवादी पक्षाकडून दर्शन सिंह यादव यांनाही उमेदवारी देण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील ५८ जागांसाठी २ एप्रिलला मतदान होणार आहे.
उत्तरप्रदेशात राज्यसभेच्या १० जागा आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविल्या. त्यामुळे त्यांच्या सदस्यांची संख्या जास्त होणार आहे. समाजवादी पक्षाचे आता राज्यसभेसाठी सहा सदस्य जाणार आहेत.
First Published: Saturday, March 17, 2012, 15:47