www.24taas.com, नवी दिल्ली आगामी काळात महागाई रोखण्यात यश येईल, अशी शक्यता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केली. दरम्यान, शेतकरीवर्गाला मोठा दिलासा या अर्थसंकल्पात देण्यात आहे आहे. महाराष्ट्रातील विदर्भाला झुकते माप देण्यात आले आहे. विदर्भातील सिंचनासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कृषीसंशोधनासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेती क्षेत्राचा बजेट १८ टक्क्यांनी वाढणार आहे. तर हरित क्रांतीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने शेतीच्या विकासाला चांगली चालना मिळणार आहे. तसेच पूर्व भारतात हरित क्रांतीचे परिणाम दिसत असल्याने शेतीच्या विकासासाठी करण्यात आलेली तरतूद यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. आधीच धान्याच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याने अन्न धान्याच्याबाबतीत देश अधिक मजबुत होण्याचे संकेत या अर्थसंकल्पात दिसून येत आहेत. तर वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला ३ टक्के सूट देण्यात येणार असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा देणारीबाब असणार आहे.
दरम्यान, पेट्रोल- डिझेलचे दर वाढण्याचे संकेत दिल्याने महागाई कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणूस महागाईत भरडला जाण्याची भिती आहे.
२०१२-१३च्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये 
किरणा व्यवसायात ५१ टक्के परकीय थेट गुंतवणूक
इंधनावरील अनुदान कमी करण्याचे संकेत
आतंरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढणार, त्यामुळे पेट्रोल- डिझेलचे दर वाढण्याचे संकेत
वाढत्या अनुदानामुळे तुटीत वाढ
जीडीपीचा दर ६.९ टक्के आहे
काळ्या पैशाला आळा घालण्याची काळाची गरज
आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
आगामी काळात महागाई कमी होणार
आगामी तीन वर्षात तूट कमी करणार
इंधनावरील अनुदान कमी करण्याचे संकेत
खतावरची सब्सिडी सुरू राहणार, शेतकऱ्यांना दिलासा
डायरेक्ट टॅक्स कोड लवकरच लागू होणार
अनुदानाचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
डायरेक्ट टॅक्स कोडने नोकरदारांना दिलासा

सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
खतांवरील सबसिडी सुरू राहणार
डायरेक्ट टॅक्स कोड लवकरच लागू होणार
पॅन कार्डची महत्त्व वाढणार
डायरेक्ट टॅक्स कोडने नोकरदारांना दिलासा
व्हॅट ऐवजी गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स लागणार
ऑगस्ट २०१२ पासून जीएसटी लागू होणार
राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम लागू करणार
शेअर बाजारात ५० हजार गुंतविल्यास सूट
१० लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना सूट
पेट्रोलवरील अनुदान घटविण्याचे संकेत
पेन्शन आणि बँकिंग विधेयक याच सत्रात सादर होणार
१५८०० कोटी सरकारी बँकांमध्ये गुंतवणार
३० हजार कोटींच्या परकीय गुंतवणुकीचे लक्ष्य
६० हजार कोटी कर मुक्त रोख्यातून जमा केले जाणार
खर्चावरील नियंत्रणासाठी कायद्यात बदल करणार
८८०० किमीचे महामार्ग बनणार
अन्न सुरक्षा कायद्यासाठी पैसा उभारण्यात येणार
महामार्गासाठी २५ हजार ३०० कोटींची तरतूद
होमलोनवर एका टक्क्याची सूट कायम राहणार
२५ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या घरांवर एक टक्का व्याज कमी
बिल्डर परदेशातून कर्ज घेऊ शकतात
शेती क्षेत्राचा बजेट १८ टक्क्यांनी वाढणार
छोट्या उद्योगांसाठी ५ हजार कोटींचा फंड
हरित क्रांतीसाठी १ हजार कोटी रुपये
पूर्व भारतात हरित क्रांतीचे परिणाम दिसत आहेत.
विदर्भातील सिंचनासाठी ३०० कोटी रुपये
धान्याच्या उत्पन्नात कमालीची वाढ
वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला ३ टक्के सूट
किसान क्रेडीट कार्डला स्मार्ट कार्डमध्ये बदलणार
एटीएममध्येही वापरता येणार किसान क्रेडीट कार्ड
नाबार्डाला १० हजार कोटींचे खास अनुदान
कृषिसंशोधनासाठी २०० कोटींची तरतूद
नवीन सार्वजनिक वितरण प्रणाली तयार होणार
११ हजार ८५० कोटी मिड डे मिलसाठी
मिड डे मिलचा चांगला परिणाम
पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी १४ हजार कोटी
२४ हजार कोटी खेड्यांमध्ये रस्ते बांधणीसाठी देणार
आगामी वर्षात नव्या ६००० शाळा बांधणार
देशातून पोलिओचं समूळ उच्चाटन झालं
शैक्षणिक कर्जासाठी वेगळा फंड तयार करण्यात येणार
राष्ट्रीय आरोग्यासाठी २० हजार ८२२ कोटी
राष्ट्रीय शहर आरोग्य योजना सुरू करणार
७ नवे मेडिकल कॉलेज सुरू करणार
विधवा पेन्शन ३०० रुपये करण्यात आले
संरक्षणासाठी १ लाख ९३ हजार ४०७ कोटी
स्वयंपाकाचा गॅस आणि रॉकेल यावरील सबसिडीचा नव्याने विचार
आधारकार्ड बनविण्याचे काम सुरूच राहणार
लोकसंख्या रजिस्टर बनविण्याचे कामही सुरू राहणार
परदेशातून काळा पैसा आणण्यासाठी प्रयत्न करणार
संसदेच्या याच सत्रात काळा पैशासंदर्भात श्वेतपत्र सादर करणार
काळ्या पैशासंदर्भात भाजपची मागणी सरकारकडून मान्य
अपेक्षा पेक्षा १५ टक्के टॅक्स जादा वसूल
७ लाख ७१ हजार कोटी टॅक्स जमा
पंचवार्षिक योजनेच्या ९९ टक्के योजना फत्ते
कर सूट १ लाख ८० हजारावरून २ लाख करण्यात आली
२ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कर नाही
२ ते ५ लाख उत्पन्न १० टक्के टॅक्स
५ ते १० लाख उत्पन्न २० टक्के टॅक्स
१० लाखांच्या वर उत्पन्न ३० टक्के टॅक्स
एक लाख ० रुपये टॅक्स
First Published: Friday, March 16, 2012, 12:28