Last Updated: Friday, March 16, 2012, 14:59
www.24taas.com, नवी दिल्ली आगामी काळात महागाई रोखण्यात यश येईल, अशी शक्यता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केली. असलीतरी घर, फोन, सिमेंट आणि सोने आदी गोष्टी महागणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे सामान्यांना पुन्हा महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.
त्यातच पेट्रोल- डिझेलचे दर वाढण्याचे संकेत दिल्याने महागाई कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणूस महागाईत भरडला जाण्याची भिती आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढणार असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होणार आहे. तर सिमेंटचे दर वाढणार असल्याने घरांच्या किमतीतही वाढ होईल. दरम्यान, एड्स आणि कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार असल्याने या रूग्णांना दिलासा मिळणार आहे. एलसीडी, एलईडी आता सामान्यांना घेता येऊ शकतील. कारण याच्या किमती कमी होणार आहेत.
काय महागणारफोन, विमान प्रवास आणि हॉटेलिंग
सेवा कर १० टक्क्यांवरून १२ टक्के
मोठ्या कारवर आता अबकारी कर (एक्साइज) आता २४ टक्के
टीव्ही, फ्रीज, मोबाईल बील
एसी, घर,
सेवा कर आणि अबकारी कर वाढल्याने सर्व वस्तू महाग
सोने, प्लॅटिनम, हिरे
सिगारेट
पार्लर, पेट्रोल
पानमसाला आणि गुटखा
सिमेंट
कार
लग्नाचे साहित्य
केबल टिव्ही
कुरिअर
बँकेचा ड्राफ
काय होणार स्वस्तएड्स आणि कॅन्सरवरील औषधं
मीठ आणि सोया उत्पादन
एलसीडी, एलईडी टीव्ही
माचिस
मोबाईल
सायकल
गृहनिर्माण सोसायटीचे दर
स्वयंपाकाचा गॅस
सीएफएल दिवे
ब्रँडेड चांदीचे दागिने
सिनेमा आणि फिल्म्स
First Published: Friday, March 16, 2012, 14:59