होम लोनवर १ टक्का सूट कायम - Marathi News 24taas.com

होम लोनवर १ टक्का सूट कायम

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
घर खेरदी कराऱ्यांसाठी सरकारने दिलासा दिला असून, पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱयांना गेल्या वर्षा प्रमाणेच यंदाही सूट मिळणार आहे. होम लोनवर १ टक्का सूट कायम राहणार आहे.
 
 
अर्थसंकल्पात रिअल इस्टेटक्षेत्रावर विशेष लक्ष दिल्याचे जाणवते. २५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याज कायम ठेवले आहे. तसेच बांधकाम व्यवसायिकांना (बिल्डर) स्वस्त घरे बनविण्यासाठी परदेशी गुंतवणुकीवर सूट देण्याची घोषणा केली आहे.  एवढेच नाही तर  फंड समस्येने ग्रस्त बांधकाम व्यवसाय क्षेत्राला नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर फायनॅन्स लिमिटेड कंपनीकडून आर्थीक मदत दिली जाणार आहे.
 
आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये गृहकर्ज घेण्या-यांना व्याजात सूट मिळणार आहे. अर्थसंकल्पानुसार २५ लाखापर्यंतच्या गृहकर्जावर १ टक्का सूट मिळेल.  सरकारने स्वस्त घरांच्या निर्मीतीला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. स्वस्त घरे तयार करणा-या बांधकाम व्यवसायीकांना परदेशी संस्थांकडून कर्ज घेण्याची सवलत दिली आहे. यासोबतच सरकार या क्षेत्राला विशेष सवलत देण्याचा विचार करीत आहे.
 
 
गेल्या वर्षी पंचवीस लाख रुपयांचे घर खरेदी करणाऱयांना करामध्ये सवलत देण्यात आली होती, यंदाही त्याचप्रमाणे राहणार आहे. स्वस्तात घर बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिक परदेशी संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

First Published: Friday, March 16, 2012, 15:23


comments powered by Disqus