अण्णांची मागणी, कसाबला फाशी द्या - Marathi News 24taas.com

अण्णांची मागणी, कसाबला फाशी द्या

झी २४ तास वेब टीम
 
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला फाशी देण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. सरकारनं अजमल कसाबला पोसणं, चुकीचं असल्याचा जोरदार टोलाही अण्णांनी लगावला.
 
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला फाशी द्यावी, ही जनभावना वेळोवेळी व्यक्त झाली. पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनीही क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला फाशीच देण्याची मागणी केली होती. त्यामुळं कसाबच्या फाशीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आता अण्णा हजारेंनीही अजमल कसाबला फाशी देण्याची मागणी केली. कसाब सारख्या दहशतवाद्याला पोसणं, ही सरकारची चूक असल्याचा आसूडही अण्णांनी ओढला.
 
अजमल कसाबचं कृत्य सगळ्या जगानं पाहिलं. कसाबमुळे निष्पाप लोकांना प्राणाला मुकावं लागलं. त्यामुळंच त्याच्या फाशीवर जनभावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. आता अण्णा हजारेंनीही वक्तव्य करून हा विषय पुन्हा ऐरणीवर आणला.

First Published: Sunday, November 13, 2011, 04:59


comments powered by Disqus