Last Updated: Sunday, November 13, 2011, 18:17
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्लीउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याचं ठरवलय. लखनौमध्ये ब्राम्हण संमेलन घेऊन त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळं मायावतींना पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगची आठवण झालीय. उत्तर प्रदेशात 8 टक्के असलेला ब्राम्हण समाज आपल्या पाठिशी रहावा म्हणून मायावतींचे प्रयत्न सुरु आहेत. बहुजन समाज पक्षातला ब्राम्हण चेहरा म्हणून ओखळला जात असलेल्या सतीश मिश्रांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावलीय. त्यामुळं पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी मायावती जोरदार प्रयत्न करत आहेत.
काँग्रेस दिग्विजय सिंहांना मुख्यमंत्री करेल या मायावती यांच्या दाव्याची खिल्ली उडवलीय. ज्या राज्याचा आपण मतदार नाही तिथं मुख्यमंत्री कसा होऊ असा सवाल त्यांनी केला आहे. मायावतींच्या या व्होट बँकेला खिंडार पाडण्याचे भाजप आणि काँग्रसचे प्रयत्न आहेत. त्यामुळं संमेलनं घेऊन मायावती रणनिती आखतायत.
First Published: Sunday, November 13, 2011, 18:17