मी कोणाचाही प्यादा नाही - दिनेश त्रिवेदी - Marathi News 24taas.com

मी कोणाचाही प्यादा नाही - दिनेश त्रिवेदी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना रेल्वे भाववाढ चांगलीच महागात पडली आहे. कारण की, त्यामुळे त्यांचं मंत्रीपद गमवावं लागलं आहे. तसचं भाववाढ केल्याने त्यांच्याविरोधात बोलले जात आहे. तर दुसरीकडे राजीनामा द्यावा लागलेल्या दिनेश त्रिवेदींनी मी कुणाचाही प्यादा नसल्याचं म्हटलं आहे.
 
दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधान मनमोहन सिंग सर्वात चांगले पंतप्रधान असल्याचं सांगितलं आहे. रेल्वे बजेट सादर केल्यानंतर ममता बॅनर्जींनी दिनेश त्रिवेदींवर हल्लाबोल करत ते काँग्रेसच्या गेम प्लानचा प्यादा असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली होती.
 
रेल्वे भाडेवाडीमुळं रेल्वेमंत्रीपद गमावलं असलं तरी तृणमुल काँग्रेस दिनेश त्रिवेदींवर कारवाई करणार नाही. तृणमुल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मुकुल रॉय यांचं नाव रेल्वेमंत्रीपदासाठी निश्चित केलं जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीत त्रिवेंदीवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र त्रिवेदींवर कारवाई करणार नसल्याचं तृणमुलच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं.
 
 
 

First Published: Monday, March 19, 2012, 13:34


comments powered by Disqus