शहाळ्याचे पाणी केरळ राज्याचे अधिकृत पेय.... - Marathi News 24taas.com

शहाळ्याचे पाणी केरळ राज्याचे अधिकृत पेय....

www.24taas.com, थिरुअनंतपुरम
 
मुंबईत कुठेही शहाळं विकणारा माणूस केरळी असतो. देशभरात शहाळं आणि नारळ यांचा पुरवठा केरळातून मोठ्या प्रमाणावर होतो. केरळ राज्य माडांच्या लागवडीत देशात आघाडीवर आहे. आता शहाळ्याचे पाणी हे लवकरच केरळ राज्याचे अधिकृत पेय म्हणून घोषित करण्यात येणार आहे हे वाचून आश्चर्य वाटायला नको.
 
केरळचे अर्थमंत्री के.एम.मणी यांनी सोमवारी राज्याच्या विधानसभेत त्या संदर्भात घोषणा केली. राज्याचा २०१२-१३ सालचा अर्थसंकल्प मांडताना मणी यांनी कि कोकनट डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहाय्याने केरळ सरकार लवकरच एकात्मिक नारळ विकास प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.
 
सरकार नारळ आणि शहाळी यांच्या मुल्यवर्धित उत्पादनासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ पुरवणार आहे. सरकारच्या या धोरणाचा केरळाच्या शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल. महाराष्ट्र सरकारनेही याबाबतीत पावलं उचलली तर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होऊ शकेल.
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Monday, March 19, 2012, 15:41


comments powered by Disqus