Last Updated: Thursday, March 22, 2012, 23:36
www.24taas.com, नवी दिल्ली कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. तरी भाजपकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही. सदानंद गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींकडे राजीनामा सोपवल्याचं वृत्त आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी गेले काही दिवस मुख्यमंत्रीपदी आपली पुर्नस्थापना करण्यात यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षावर दबाव टाकला होता. गौडांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने येडियुरप्पांच्या यांच्या दबावासमोर हात टेकल्याचं स्पष्ट झालं आहे.
First Published: Thursday, March 22, 2012, 23:36