शकिराच्या आगमनाने, उंटही थिरकू लागले - Marathi News 24taas.com

शकिराच्या आगमनाने, उंटही थिरकू लागले

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्लीती आली, तिने पाहिलं, आणि तिने जिंकले, तिच्या हजारो चाहत्यांनी उसासे टाकायला सुरवात केली. अहो कोण म्हणून काय विचारता, जगभरातल्या संगीत शौकिनांना वेड लावणारी शकिरा भारतात उदयपूरी अवतरली आहे.वाका वाका गाण्याने शकिराने संगीत रसिकांना बेधुंद केलं. डीएलएफचे सर्वेसर्वा के.पी.सिंग यांच्या वाढदिवसाच्या समारंभात शकिरा आपली अदाकारी सादर करणार आहे. शकिरा आपल्या बँड सोबत एका खाजगी विमानाने उदयपूरला पोहचली.शकिराचं विमान उदयपूरच्या विमानतळावर उतरलं तेंव्हा शेकडो चाहत्यंनी तिला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. पण कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे शकिराच्या चाहत्यांना केवळ तिची एक झलकच पाहायला मिळाली. शकिरा आल्याचं कळताच दहा किलोमिटरचा प्रवास करुन गेलेला राजीव शर्मा नावाच्या फॅनची घोर निराशा झाली. विमानतळावर शकिरा थेट उदयविलास हॉटेलमध्ये दाखल झाली. याआधीही शकिरा २००७ साली एका कन्सर्टसाठी उदयपूर भेटीवर आली होती.शकिराची यूनिसेफची गुडवील ऍम्बासॅडर म्हणून २००३ साली नियुक्त करण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणून ती राज्य शैक्षणिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट देणार आहे. या संस्थेतील मुलींशी शकिरा संवाद साधणार आहे. किंग खानही आज उदयपूरात येण्याची शक्यता आहे.

First Published: Tuesday, November 15, 2011, 14:42


comments powered by Disqus