Last Updated: Sunday, March 25, 2012, 16:19
www.24taas.com, नवी दिल्ली टीम अण्णांच्या अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन वादंगाला तोंड फोडलं आहे. शरद यादव यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद भडकण्याची शक्यता आहे.
सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत असं केजरीवाल म्हणाले. अजित सिंग यांनी युपीए सरकारला पाठिंबा देण्यासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तर कमलनाथ तांदुळ घोटाळ्यात अडकल्याचं तसचं फारूक अब्दुल्लाही घोटाळ्यात सहभागी असल्याचं विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. तेलगीने शरद पवारांचे नाव आपल्या जबानीत घेतल्याचंही केजरीवाल म्हणाले आहेत.
शरद यादव यांच्या भाषणाची चित्रफीत दाखवून अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. तसंच लालू प्रसाद यादव हे देखील संसदेत विधेयक फाडतानाची चित्रफीत दाखवण्यात आली आहे. अण्णा हजारे दिल्लीत जंतरमंतर इथे उपोषणाला बसले आहेत, त्या ठिकाणी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हे विधान केलं.
First Published: Sunday, March 25, 2012, 16:19