अमुलचे कॅमल दूध लवकरच बाजारात - Marathi News 24taas.com

अमुलचे कॅमल दूध लवकरच बाजारात

www.24taas.com,अहमदाबाद
 
गुजरातमध्ये लवकरच व्यापारी तत्वावर सांडणीच्या दुधावर प्रक्रिया आणि त्यापासून दुग्धोत्पन्न पदार्थ निर्मितीसाठी डेअरी सुरु करण्यात येणार आहे. गुजरात राज्य सरकारने २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली असून कच्छ जिल्ह्यात या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. आजवर पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
 
 
कच्छ जिल्हा सहकारी दूध संघ किंवा सरहद डेअरीकडून गुजरात सरकारला अशा स्वरुपाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दुध संकलनाचे जाळं विकसीत करण्यासाठी कच्छ उंट उछेरक मालधारी संघटनची स्थापना करण्यात आली आहे.
 
 
सहजीवन या स्वंयसेवी संस्थेला उंट प्रजोत्पादकांना एकत्र करणे आणि सांडणीच्या दुधाच्या आर्थिक तसंच पोषण मुल्यांच्या महत्वासंदर्भात जागृती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच अमूलने सांडणीच्या दुधाचे विपणन करण्याचे मान्य केलं आहे. सांडणीच्या दुधात पोषण मुल्य अधिक आणि कमी फँट असतात.
 
सांडणीच्या दुधावर प्रक्रियेसाठी व्यापारी तत्वावर डेअरी स्थापन करण्यासाठी २०१२-१३ अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचं पशूपालन खात्याचे संचालक डॉ.ए.जे.कच्छियापेटली यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. सरहद डेअरकडून २००० ते २५०० लिटर्स दुध प्रक्रिया प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव आल्याचंही त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प दोन उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन हाती घेण्यात आला आहे, एक स्थानिक असलेल्या मालधारी समाजाला उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करुन देणं.
 
 
तसंच उच्च पोषण मुल्य तसेच कमी फॅट आणि पचनाला सोपं असणाऱ्या सांडणीच्या दुधाचा वापर वाढवणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. कच्छमध्ये वाहतूकीसाठी उंटाचा वापर कित्येक शतकांपासून होत आहे. त्यामुळे त्याकाळी उंटांच्या विक्रीतून मालधारींना चांगले उत्पन्न मिळत असे. पण वाहतूकीची पर्यायी साधनांमुळे उंटाची विक्री कमी झाली आहे आणि त्याबरोबर मालधारींचे उत्पन्नही घटलं आहे. मालधारींना या प्रकल्पासाठी राजी करण्याची जबाबदारी कच्छ उंट उछेरक मालधारी संघटनेने पार पाडली आहे. या प्रकल्पासाठी ३४९ मालधारींनी याआधीच नोदंणी केली आहे.
 
 
सध्या सहजीवन ही संस्था सांडणीच्या दुधापासून बनवलेले आईस्क्रिम आणि खीरीच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे आणि त्याची विक्रीत भुज  इथे करण्यात येत.. कच्छ हा आकारमानाने मोठा जिल्हा असल्याने  दूध संकलन करणं हे अत्यंत जिकीरीचे आहे पण हे लक्षात घेत  दूध संकलन केंद्राची योजना आखण्यात आली आहे.
 
 

First Published: Monday, March 26, 2012, 18:59


comments powered by Disqus