स्वतंत्र तेलंगणावरून रणकंदन - Marathi News 24taas.com

स्वतंत्र तेलंगणावरून रणकंदन

www.24taas.com, हैदराबाद 
 
 
तेलंगाणाच्या मुद्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. टीआरएसच्या खासदारांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणी करत गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मात्र सत्ताधा-यांनाच लक्ष्य केलं.
 
 
संसदेत विरोधकांची चर्चेची तयारी असते मात्र  सत्ताधारी खासदारच सर्वाधिक गोंधळ घालतात आणि चर्चा होऊ देत नाहीत असा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधा-यांवर केला. दरम्यान,  स्वतंत्र तेलंगणाच्या लढ्यात वारांगण जिल्ह्यातील दोन जणांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे.
 
 
तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारच्या उदासीनतेच्या निषेधार्थ तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आज  आंध्र प्रदेश बंद आंदोलन पुकारले आहे.  तेलंगणातील अनेक दुकाने आणि व्यापारी संकुले बंद ठेवण्यात आली असून, हैदराबादमधील दहा जिल्ह्यात बंदला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आहे.  राज्य रस्ते वाहतूक प्राधिकरणाची बस सेवा सकाळपर्यंत सुरू होती. मात्र, टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बस बंद पाडल्या.
 
 
 
रिक्षा संघटनादेखील बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.  तेलंगणा बंदला तेलंगणा संयुक्त कृती समिती, कॉंग्रेसचे तेलंगणा नेते, तेलगु देसम पक्ष, भारतीय जनता पक्ष, ओस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समिती आणि अन्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

First Published: Wednesday, March 28, 2012, 09:50


comments powered by Disqus