मुंबई शेअर बाजार २०४ पॉइंट्सनी वधारला - Marathi News 24taas.com

मुंबई शेअर बाजार २०४ पॉइंट्सनी वधारला

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज १७ हजार २५७ अंशावर बंद झाला. कालच्या तुलनेत त्यात २०४ पूर्णांक ५८ अंशांची वाढ दिसून आली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक आज ५ हजार २४३ अंशावर बंद झाला. निफ्टी निर्देशांक. ५८ पूर्णांक १५ अंशांनी वाढला.
 
मागच्या तुलनेत शेअर बाजार आज काहीशा वरच्या पातळीवर खुला झाला, मात्र त्यानंतर तासभर तो घसरत राहिला, दुपारच्या सत्रात थोडीशी वाढ झाली आणि ती बऱ्याच वेळ स्थिर राहिली, दुपारी दोनच्या सुमारास बाजाराने तब्बल १७ हजार ३५० अंशांपर्यंत उसळी घेतली पण त्यानंतर सातत्याने घसरण पहायला मिळाली आणि बंद होताना तो १७ हजार २५७ अंशावर स्थिरावला. राज्याच्या बजेटमध्ये मुद्रांक शुल्कात तीव्र वाढ कऱण्याचे संकेत सरकारने दिले होते. पण प्रत्यक्षात तशी वाढ केली नसल्यामुळे घसरलेल्या रियल इस्टेट स्टॉक्स पुन्हा वाढायला सुरूवात झालीय..बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेल कारवरच्या करवाढीच्या घोषणेमुळे मारूती सुझुकीच्या स्टॉक्समध्ये घट झाली.
 
खुल्या सामान्य परवान्या अंतर्गत सरकारनं १० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तामुळे साखर कंपन्याच्या शेअर विक्रीत वाढ पहायला मिळाली. बाजार बंद होतांना डीएलएफ, सिप्ला, स्टरलाईट इंडिया, एचयुएल आणि भारती एअरटेल या कंपन्याचे शेअर्स वधारलेत तर मारूती सुझुकी, भेल, एनटीपीसी, सन फार्मा आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.

First Published: Wednesday, March 28, 2012, 09:55


comments powered by Disqus