Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:01
www.24taas.com, म्हैसूर म्हैसूरमध्ये एका १२ वर्षीय मुलीला परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिच्या वडिलांनी तिला भीक मागायला भाग पाडल्याची एक धक्कादायक घटना घडली. वरिष्ठ लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या प्रकाश स्वामींनी आपल्या सातवीतील मुलीने परिक्षेत खराब कामगिरी केल्यामुळे शाळेच्या गणवेशात मंदिराच्या बाहेर भिक मागायला बसवलं.
एका स्वंयवेवी संस्थेत काम करणाऱ्या माणसाला ही मुलगी मंदिराच्या बाहेर रडताना दिसल्यांतर त्याने तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशला अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला जामीन दिला. प्रकाश स्वामी विरोधात केस दाखल करण्यात आली हे. प्रकाशने आपण हे कृत्य मुलीला जीवनातील खडतर परिस्थितीशी सामना कसा करावा हे शिकवण्यासाठी केल्याचं पोलिसांना सांगितलं.
मी उशीरा उठले की रोज वडिल ओरडत असत आणि काल मला कमी गुण मिळाल्यामुळे ते संतापले आणि त्यांनी अल्युमिनियमचं भांडं हात देत मंदिराच्या बाहेर भीक मागण्याची सक्ती केली असं या मुलीने पोलिसांना सांगितलं. आता ही मुलगी बाल कल्याण कमिटीच्या कस्टडीत आहेत. या मुलीच्या वडिलांनी आपली प्रतिष्ठा घालवल्याचं कारण देत तिचा घरी परत न्यायला नकार दिला आहे.
First Published: Wednesday, March 28, 2012, 13:01