Last Updated: Wednesday, March 28, 2012, 12:31
www.24taas.com, अमृतसर 
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअन्त सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या बलवंत सिंहची फाशी रद्द करण्याच्या मागणीवर आज पंजाब बंद ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संपूर्ण पंजाबमध्ये जोरदार प्रदर्शन सुरू आहे.
अमृतसर जालंधर, पटियाला, रोपड, लुधियानासह सर्वच शहरात लोक प्रदर्शन करत आहेत. तसंच पाकिस्तानच्या ननकाना साहिबमध्येही लोकांनी बलवंत सिंहची फाशीची शिक्षा टाळण्याच्या मागणीवर प्रदर्शन केलं आहे.
सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनंही बलवंत सिंहची फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेच्या शिक्षेत रुपांतर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.
First Published: Wednesday, March 28, 2012, 12:31