बँक फिक्स डिपॉझिटचे व्याजदर वाढण्याची शक्यता - Marathi News 24taas.com

बँक फिक्स डिपॉझिटचे व्याजदर वाढण्याची शक्यता

www.24taas.com, नवी दिल्ली
 

बँकांच्या त्यांच्या फिक्स डिपॉझिटचे व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. केंद्रिय अर्थसंकल्पात पीपीएफ आणि नॅशनल सेव्हींग सर्टीफिकीटचे व्याजदर वाढवण्यात आल्यामुळे आता फिक्स डिपॉझीटचे व्याजदर वाढवण्यासाठी बॅंकावरचा दबाव वाढतोय.
 
सरकारनं पीपीएफचा व्याज दर ८.८ % केल्यामुळे गुंतवणुकदरांना ५५.४० टक्के रिटर्न मिळणार आहे. तर नॅशनल सेव्हींज सर्टीफिकेटचा व्याजदर ८.६ % केल्यामुळे सुमारे ५५ टक्के रिटर्न मिळणार आहे.
 
पीपीएफ, एनएससी आणि सध्याच्या बॅंक एफ डीच्या रिटर्नमधल्या घटत्या दरांमुळे बॅंकांच्या एफडी व्याजदर वाढवण्यासाठी बॅंकावर दबाव वाढू लागलाय.

First Published: Wednesday, March 28, 2012, 20:23


comments powered by Disqus