Last Updated: Thursday, March 29, 2012, 10:36
www.24taas.com, नवी दिल्ली बंद आणि वाढता तणाव लक्षात घेऊन पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्याकांडातील दोषी बब्बर खालसाचा दहशतवादी बलवंतसिंग रोजाना याच्या फाशीच्या शिक्षेला केंद्र सरकारने स्थगिती दिली आहे.
बलवंतसिंगला ३१ मार्च रोजी फासावर लटकवण्याचे आदेश चंदीगड न्यायालयाने दिल्याने पंजाबमध्ये कट्टरवादी शीख संघटनांनी बंद पुकारला होता. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनीही केंद्राकडे बलवंतसिंगच्या फाशीस स्थगिती देण्याची मागणी केली होती. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक स मतीने बलवंतसिंगच्या फाशीला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज केल्याने केंद्र सरकारने त्याच्या फाशीस स्थगिती दिली.
दरम्यान, पंजाबमध्ये कट्टर शीख संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. पटीयाला येथे यावेळी झालेल्या पोलीस-कार्यकर्त्यांच्या झटापटीत सहा जण जखमी झाले. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या.
First Published: Thursday, March 29, 2012, 10:36