Last Updated: Monday, April 2, 2012, 23:19
www.24taas.com, तिरूमला 
आंध्रप्रदेशमधल्या तिरुमल मंदिर संस्थानानं रविवारी रामनवमीच्या दिवशी देणगी आणि हुंड्याच्या स्वरूपात जमा होणाऱ्या रकमेचा विक्रमी उच्चांक गाठला. भाविकांकडून रविवारी ५ कोटी ७३ लाखांची विक्रमी हुंडी मंदिरात जमा झाली.
गेल्या पाच महिन्यांपासून मंदिरात, दरदिवशी सरासरी दीड ते दोन कोटी रूपये हुंडी जमा होत होती. एक जानेवारीला ४ कोटी २३ लाख रूपयांची उच्चांकी हुंडी जमा झाली होती. मात्र रविवारी हा उच्चांकही मोडला गेला.
जगातील सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान अशी तिरूमल मंदिराची ख्याती आहे. या मंदिरात अनेक भक्त येतात, फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून त्यांचे भाविक हे येतात आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात दान होत असतो.
First Published: Monday, April 2, 2012, 23:19