Last Updated: Tuesday, April 3, 2012, 21:45
www.24taas.com, बंगळूर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले असल्याने माहिती, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा येडियुरप्पा चर्चेत आले आहे.
येडियुरप्पा यांनी पुन्हा आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शक्तीप्रदर्शनासाठी ते कर्नाटक राज्याचा दौरा करणार आहेत. मात्र, त्याआधीच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा बॉम्ब टाकला आहे. राज्यसभेच्या निवडणुका झाल्यावर मला मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती खुद्द येडियुरप्पा यांनी दिली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदासाठी किती उतावळे झाले आहेत, ते स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले, मी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकणार नाही. सध्या भाजपचे वरिष्ठ नेते राज्यसभा निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. तसेच ६४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा येडियुरप्पा यांनी केला आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर मुख्यमंत्रिपदासाठी येडियुरप्पा सातत्याने दबाव टाकत आहेत. या आठवड्यात येडियुरप्पा यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
First Published: Tuesday, April 3, 2012, 21:45