Last Updated: Wednesday, April 4, 2012, 08:08
www.24taas.com, पणजी
गोव्याच्या खाण उद्योगातील भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर आता कारवाईचं सत्र सुरू झालं आहे. न्यायमूर्ती शहा आयोगाकडून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे.
हा अहवाल येण्यापूर्वीच गोवा सरकारनं खाण विभागाला दणका देत संचालक अरविंद लोलयेकर यांना निलंबित केलं आहे. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी होत्या. याशिवाय गोव्यातील सर्वच खनिज ट्रेडर्सना कारणे दाखवा नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहा आयोगाचा अहवाल येण्यापूर्वीच खाण विभागात खळबळ माजली आहे.
गोव्यातील हजारो कोटींच्या खाण घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिक लोकलेखा समितीनं ताशेरे ओढले होते. गोव्यातून निर्यात करण्यात आलेलं ५० टक्के खनिज बेकायदेशीर असल्याचं या समितीच्या अहवालात म्हटलं आहे.
First Published: Wednesday, April 4, 2012, 08:08